सांगोला ( प्रतिनिधी )- पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी आधार व्हावा म्हणून तिप्पेहळी ता.सांगोला येथील एका गरजू महिलेला आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार मनोज उकळे सर यांच्या हस्ते पिठाची गिरणी भेट देण्यात आली.
तिप्पेहळी येथील मनिषा सचिन नरळे यांच्या पतीचे गेल्या महिन्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाशात पत्नी, भाऊ,आई, दोन लहान मुले असा मोठा परिवार आहे. मनिषा नरळे याही आजारी असतात. त्यांना आजारपणाच्या खर्चासाठी तिपेहळी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन वेळोवेळी मदतही केली आहे.
आपुलकी प्रतिष्ठान सांगोलाच्या वतीने नरळे कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी छोटीशी मदत म्हणून पिठाची गिरणी दै. पुण्यनगरीचे पत्रकार मनोज उकळे सर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी भेट देण्यात आली. यावेळी आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अरविंद केदार, शशिकांत येलपले, अनिल विभुते, अरविंद डोंबे, रमेश गोडसे, प्रसन्न कदम, महादेव दिवटे, प्रमोदकाका दौंडे आदिसह उद्योगपती किरण पांढरे, पोलीस पाटील राजू करांडे, विश्वनाथ सांगोलकर सर, प्रा.दत्तात्रय नरळे सर, पांडुरंग बजबळकर, सुहास माने, उदय नरळे सर, किरण मोरे आदिसह नरळे कुटुंबीय उपस्थित होते.
पत्रकार मनोज उकळे सर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी २५०१/- रुपये देणगी दिली. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने उकळे सरांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
उद्योगपती किरण पांढरे यांनीही नरळे कुटुंबीयांना रोख ५०००/- रुपयांची मदत देऊन सहकार्य केले. यापुढेही या नरळे कुटुंबीयांना मदत करू असे सांगितले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक