सांगोला (प्रतिनिधी): सांगोला -मिरज रोड येथील आर यू बी क्रमांक-32A रेल्वे ब्रिजखाली अनेक मोठ– मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात सातत्याने पाणी साठत असल्याने या ब्रिजमध्ये वारंवार अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे , येथील रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना यांच्यावतीने सहाय्यक मंडल अभियंता, पंढरपूर व वरिष्ठ मंडळ विद्युत इंजिनियर, मध्य रेल्वे सोलापूर यांना देण्यात आले आहे.
सायंकाळी पुर्णपणे याठिकाणी अंधार असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, मोठा अपघात होऊन जिवित हानी होऊ शकते, सध्या या मार्गावर पाणी नसल्याने उन्हाळ्यात या मार्गाचे परिसरातील काम दर्जेदार होऊ शकते.पावसाळ्यापूर्वी येथील कामे पूर्ण करावीत तरी आपणास यापूर्वी देखील आपणास 5–6 निवेदनपत्रा द्वारे कळविण्यात आले होते. अनेक वेळा रेल्वे विभाग, जिल्हाधिकारी,नगरपालिका, MSEB विभागाकडे अनेकवेळा स्ट्रीट लाईट बसवावी व ते गरजेचे आहे याबाबत पत्रव्यवहार केले आहे. प्रत्येक विभाग आमच्याकडे या कामाची जबाबदारी नाही असे म्हणतात व जबाबदारी झटकतात,आपणास अंतिम पत्राद्वारे कळविण्यात येते की याठिकाणी मर्क्युरी दिवे (स्ट्रीट लाईट) बसवावेत अन्यथा अपघात झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहील.या निवेदनाच्या प्रती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत.
तरी या प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाला केंव्हा जाग येणार ?
रेल्वे विभाग ऐन पावसाळ्यात येथील मेन्टेनन्सचे काम सुरू करते त्यामुळे या काळात दर्जेदार काम होत नसल्याने वारंवार येथील काम करावे लागत आहे त्यामुळे सांगोलकरांना याचा नाहक त्रास होत आहे . तसेच येथील पथदिव्यांचा अनेक वर्षापासून रखडलेला विषय मार्गी लावावा,सध्या उन्हाळ्याचे दिवस असलेले येथील पाणी पूर्णपणे बंद झालेने विना व्यत्यय , दर्जेदार काम होऊ शकते. संबंधित रेल्वे विभागाने तात्काळ कार्यवाही करावी.
– निलकंठ शिंदे सर ,
अध्यक्ष – शहीद अशोक कामटे संघटना सांगोला
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक