आमचं आरक्षण दुसऱ्याला द्याल तर याद राखा… आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख गणेश अंकुशराव यांचा शासनाला इशारा

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): सध्या आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आदिवासी समाजाचे नेते लकीभाऊ जाधव, नरहरी झिरवाळ, किरण लामटे, अमित भांगरे यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आदिवासी कोळी जमातीच्या लढ्याचे प्रमुख गणेश अंकुशराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पंढरपुरातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे चौकात जोरदार घोषणाबाजी करत शासनाला इशारा दिला आहे.

पहा व्हिडिओ 👇

https://youtu.be/3jsYuhitYko?si=HMF2lHDR19bbnrKp

आदिवासी कोळी जमातीच्या प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे, परंतु आमच्या प्रश्नांकडं शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. आमच्या आदिवासी च्या हक्काचं काढून इतर समाजाला देण्याचा घाट घातला जात आहे. हे आम्ही कदापिही सहन करणार नाही. शासनाने तातडीने पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, आदिवासी एस.टी. आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करू नये, सरकारने शिंदे समिती स्थापन करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, टाटा टीस इंस्टीट्यूट समितीचा अहवाल ताबडतोब प्रसिद्ध करावा, पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक तातडीने उभे करावे, अशी मागणी करत गणेश अंकुशराव यांनी मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत असलेले नरहरी झिरवळ यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आदिवासी स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिला आहे. यावेळी आदिवासी महादेव कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here