सांगोला (प्रतिनिधी): प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा डिकसळची विद्यार्थिनी कु.कोमल राजू व्हरगर हीची राज्याच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली असून, हे सामने ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी नागपूर येथे होणार आहेत.
अत्यंत गरीब कुटुंबातील,डोंगर दऱ्यात राहणारी कोमल ही १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असून, प्रशालेच्या १७ वर्षीय मुलींच्या टीमचे नेतृत्व करते. विभागीय स्पर्धेतील सर्वच सामन्यात चमकदार कामगिरी केल्याने तिची राज्याच्या संघात निवड झाली आहे. ही आश्रम शाळेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. याच कोमल मुळे गावाचे नाव ही उज्ज्वल झाले आहे. त्याबद्दल कु. कोमल राजू व्हरगर व प्रशिक्षक श्री.यादव सर यांचे मुख्याध्यापक श्री.तुकाराम भुसनर सर, संस्था व सर्व शिक्षक, अधीक्षक व इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक