सांगोला (प्रतिनिधी): रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील कार्याबद्दल प्रसिद्ध सिनेमा अभिनेत्री सायली पाटील सिनेमा अभिनेता महेशदादा देवकाते महाराष्ट्र शासन मंत्रालय गृह विभाग मा. महादेव सातपुतेसाहेब समाजसेवक बाळासाहेब चिखलकर व मीडियाचे संपादक मा. राहुल कुदनर यांच्या शुभहस्ते प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मध्य विभागाचे चेअरमन मा. संजीव पाटील माजी आमदार धनाजीतात्या साठे नगराध्यक्षा मीनलताई साठे जनरल बॉडी सदस्य प्राचार्य डॉ.जे .जी. जाधव प्रा. नानासाहेब लिगाडे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर प्राचार्य डॉ. के .एच. शिंदे प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे प्राचार्य डॉ.सुरेश ढेरे प्राचार्य डॉ. एस.टी. साळुंखे प्राचार्य डॉ.धीरज बाड यांनी अभिनंदन केलेआहे. डॉ. दत्तात्रय काळेल हे मूळचे खिलारवाडी ता. सांगोला येथील रहिवासी आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक