विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा २ साउथ तांत्रिक समितीवर प्रमोद दौंडे यांची निवड

0

सांगोला (प्रतिनिधी):आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण शिर्डी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या सी बी एस ई पॅटर्न नवी दिल्ली विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा साउथ झोन २ या स्पर्धेचे तांत्रिक समितीवर सांगोला येथील तायक्वांदो प्रशिक्षक नॅशनल गेम्स प्लेयर मास्टर प्रमोद दौंड यांची निवड झाली. सदरचे स्पर्धेमध्ये सी बी एस ई साउथ झोन २ विभागीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू व केरळ येथील सुमारे २००० तायक्वांदो खेळाडू सहभागी होणार आहेत गेली तीस वर्षाचा त्यांचा तायक्वांदो चा या क्रीडा प्रकारांमधील अनुभव पाहता या स्पर्धेच्या तांत्रिक समितीवर त्यांची निवड झाली. गतवर्षीही लातूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेच्या तांत्रिक समितीवर ही त्यांची निवड झाली होती. सदर निवड ही इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री संदीप ओंबासे,सचिव अमजद खान पठाण, खजिनदार डॉक्टर प्रसाद कुलकर्णी यांनी केली.

सदरच्या निवडीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार शहाजीबापू पाटील, उपाध्यक्ष शिवराज मुगळे, खजिनदार गुरुलिंग गंगनहळी, सहसचिव नेताजी पवार, सोमनाथ बनसोडे यांच्यासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here