किरण भांगेंच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर जोरदार शक्तीप्रदर्शन
संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ कार्यान्वित करा, या मागणीसाठी राज्यभरातील नाभिक समाज सोमवारी मुंबईत एकवटला. सकल नाभिक समाजाने आझाद मैदानात महाआंदोलन केले. या आंदोलनाला कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते योगेश केदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. समाजाचे समन्वयक किरण भांगे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ सप्टेंबर २०१९ला संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन केले. राज्यसरकारने केशशिल्प महामंडळास एक हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, उपकंपनीचे मुंबई मुख्यालयातील १२ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे भरावी, संचालक मंडळातील अध्यक्षसह उपाध्यक्ष, शासकीय सदस्यांची निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिबिल व जामिनदारांची अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड कार्यालय, माहितीपत्रक यांच्यावर सेना महाराजांचा फोटो वापरावा आदी मागण्या यावेळी समाज बांधवांनी केल्या.या आंदोलनात महाराष्ट्रातील हजारो नाभिक बांधव उपस्थित होते.
राज्यात सुमारे ४५ लाख हुन अधिक नाभिक समाज बांधव आहेत. या महाआंदोलनात समाजाच्या सुमारे ४० हून अधिक संघटना या सकल नाभिक समाजाच्या झेंड्याखाली पहिल्यांदाच एकत्र आल्या होत्या.
मुंबई येथील आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन मध्ये उपस्थिती, हजारो नाभिक बांधव उपस्थित होते, आंदोलन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले स्टेज, बसण्यासाठी सतरंज्या, मुक्कामी आलेल्या बांधवांसाठी अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, भिवंडी येथे निवास व्यवस्था तसेच नाश्त्याची सोय, अंघोळीची सोय तसेच आंदोलनाच्या ठिकाणी 12000 वडापाव, 12 हजार पाण्याच्या बाटल्या हा सर्व खर्च राष्ट्रीय नाभिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण शेठ जाधव व सरचिटणीस महेंद्र शेठ जाधव यांनी केला त्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक