मंथन वेल्फेअर मंडळ अहमदनगर संचलित ‘मंथन’ ही शालेय स्पर्धा परीक्षा रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी १२:०० ते ४:०० यावेळेत सांगोला-१ विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल सांगोला, सांगोला-२ न्यू इंग्लिश स्कूल सांगोला, आनंद विद्यालय कमलापूर, विकास विद्यालय अजनाळे, नाझरा विद्यामंदिर नाझरा, कोळा विद्यामंदिर कोळा, गुरुकुल विद्यालय राजुरी, जवाहर विद्यालय घेरडी, कडलास हायस्कूल कडलास, छत्रपती शिवाजी विद्यालय धायटी, वाकी विद्यामंदिर वाकी, शिवाजी विद्यालय महूद या १२ केंद्रावर पार पडणार असल्याची माहिती शालेय स्पर्धा परीक्षा तालुका समन्वयक समाधान केदार यांनी दिली आहे.
सदर स्पर्धा परीक्षा ही १२:०० ते १:३० मराठी व गणित विषय पेपर क्रमांक-१ तर १:३० ते २:३० मधली सुट्टी असेल याशिवाय २:३० ते ४:०० यावेळेत इंग्रजी व बुद्धीमत्ता पेपर क्रमांक-२ अशा निर्धारित वेळेत पार पडेल.
संबंधित विद्यार्थी, पालक व शिक्षक बांधवांनी आपापल्या हॉल तिकीट वरील नमूद केलेल्या केंद्राची खात्री करून परीक्षेच्या अगोदर परीक्षा केंद्रावर अर्धा तास उपस्थित रहावे असे आवाहन समाधान केदार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९७६५७६६०४८ यांच्याशी संपर्क साधावा.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक