सांगोला येथे ब्रेवरी अबॅकस आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय ब्रेवरी अबॅकस स्पर्धा दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. या स्पर्धेत ब्रेवरी अबॅकस सांगोला शाखेचे विद्यार्थी विराज सचिन पाटील व स्वरा स्वप्निल शिंदे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत फस्ट लेव्हल मध्ये ८ ते १० वयोगटात स्वरा स्वप्निल शिंदे ( उत्कर्ष स्कुल, सांगोला) हिने , ज्युनियर लेव्हल फिंगर वरिती मध्ये ११ ते १४ वयोगटातून विराज सचिन पाटील ( सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल) यांने व फस्ट लेव्हल मध्ये ११ ते १४ वयोगटातून विराज सचिन पाटील ( सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडियम स्कूल) यांने प्रथम क्रमांक मिळविला.
सदर स्पर्धेत विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रश्न विचारात त्यांच्यातील गणितीय आकडेमोडे कौशल्यची तपासणी करण्यात आली. फस्ट लेव्हल मध्ये असणाऱ्या ३४ सुत्रांच्या आधारे तोंडी पध्दतीने गणितीय आकडेमोड अचूकपणे करून प्रथम क्रमांक मिळविला.
ज्युनियर लेव्हल फिंगर वरिती श्रेयश सचिन पाटील ( सांगोला विद्यामंदिर प्रशाला)यांने तिसरा क्रमांक व श्रीओम भानवसे ( फॅबटेक पब्लिक स्कुल) पाचवा क्रमांक मिळविला. फस्ट लेव्हल मध्ये ८ ते १० वयोगटात ईश्वरी सुभाष पाटील (फॅबटेक पब्लिक स्कुल) हिने तिसरा क्रमांक, शिवानी क्षीरसागर ( उत्कर्ष स्कुल) हिने चौथ्या क्रमांक व श्रीओम भानवसे ( फॅबटेक पब्लिक स्कुल) यांने पाचवा क्रमांक तसेच ११ ते १४ वयोगटातून श्रेयश सचिन पाटील ( सांगोला विद्यामंदिर प्रशाला) यांने तिसऱ्या क्रमांक मिळविला.
सेंकड लेव्हल फिंगर वरिती गुरूराज म्हेत्रे ( सांगोला विद्यामंदिर प्रशाला) यांने दुसऱ्या क्रमांक व श्रुती कांबळे ( फॅबटेक पब्लिक स्कुल) हिने तिसरा क्रमांक मिळविला.
थ्रर्ड लेव्हल मध्ये श्रुती कांबळे ( फॅबटेक पब्लिक स्कुल) हिने चौथ्या क्रमांक मिळविला.
वरील सर्व विद्यार्थ्यांना ब्रेवरी अबॅकस सांगोला शाखेचे प्रमुख गणेश मेटकरी सर यानेच मार्गदर्शन लाभले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक