कमलापूर गोडसेवाडी ग्रामस्थांनी मनीषा हवळे यांना हळदी कुंकू लावून महिलेचा केला सन्मान

0

शुभम हवळे पुनम हवळे या दोन्ही मुलांच्या पुढाकार्याने कार्यक्रम यशस्वी

सांगोला तालुक्यातील गोडसेवाडी (कमलापुर) येथील शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते शुभम हवळे यांचे वडील स्व.संदिप‌ हावळे यांचे‌ एक वर्षापुर्वी दुख:द निधन झाले असुन होते एका वर्षानंतर‌ आपला‌ कुटुंब प्रमुख गेलेला आसताना त्या वेदना सहन करत त्यांच्या पत्नी व कुटुंब दुख:द मनाने‌ वावरत असताना त्या पत्नीला‌ समाजामध्ये वावरत असताना त्यांचेकडे पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो मानसीकता वेगळी असते त्या चुकीच्या परंपरेला फाटा देत आज त्या दुःखी पत्नीला अनिष्ठ चाली रितीला मातीत गाढत स्व.संदीप हावळे यांच्या‌ पत्नी मनीषा संदीप हावळे यांना सौ.डाॅ.निकिताताई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या महिलांच्या उपस्थितीत सौभाग्य अलंकार आंगावरती घालत जोडवी हिरवी साडी हिरवी बांगडी परिधान करून मान्यवरांच्या उपस्थित महिलांनी त्यांना हळदी कुंकु लावुन छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहु महाराज ,महात्मा जोतिबा फुले ,सावित्रीबाई फुले व डाॅ.बाबासाहेब‌ आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवत सांगोला तालुक्याची मान उंचावण्याचे काम या हावळे कुटुंबियांनी व गोडसे वाडी ग्रामस्थानी केले आहे अनिष्ठ रुढींना मुठमाती देत आशा उपक्रमांची गरज आज निर्माण झाली आहे असे निकिताताई देशमुख यांनी सांगितले.

या कार्यक्रमास चेअरमन डॉ प्रभाकर माळी, सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा माळी, माय सरपंच लता गोडसे, माय सरपंच बाबुराव बंडगर, पत्रकार जगदीश कुलकर्णी, साधू गोडसे, उत्तम आदलिंगे, दत्तात्रय आदलिंगे, बंडगर सर, श्रीराम गोडसे, दामोदर हावळे, केराप्पा देवळे, नामदेव देवळे, प्रसाद देवळे, शामराव हावळे, शुभम हवळे पूनम हावळे अनिता गोडसे कल्पना गोडसे दत्तात्रय गोडसे मारुती काळेबाग वंदना गोडसे कस्तुरा कोळेकर मीनाक्षी अनुसे मंगल आदलिंगे सुनीता चव्हाण शितल वाघमोडे इंगोले मॅडम कांता गोडसे सारिका आदलिंगे यांच्यासह आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास कमलापूर गोडसेवाडी परिसरातील महिलांनी प्रचंड संख्येने गर्दी करून हावळे कुटुंबीयांना घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना गोडसे आभार शुभम हावळे पूनम हवळे यांनी मानले…

आमचे वडील गेल्यानंतर आईची परिस्थिती पाहावत नव्हते म्हणून आम्ही हवळे कुटुंबांनी इतर महिलाप्रमाणे मान मिळाला पाहिजे या उद्देशाने सौभाग्य अलंकार हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचा ठरवलं तो यशस्वी झाला..

~ कु शुभम हवळे (मुलगा)

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here