बुरलेवाडी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! जल्लोष 2025 कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी):जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरलेवाडी व अंगणवाडी केंद्र बुरलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष 2025 उत्साहात संपन्न झाला.

प्रथमतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ उमाताई इंगवले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन बुरले अंगणवाडी सुपरवायझर सरस्वती जाधव मॅडम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले गणेश वंदना गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात अंगणवाडी व मराठी शाळा यामधील सर्व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यामध्ये देशभक्तीपर गीते कोळीगीते बालगीते लोकनृत्य पारंपारिक नृत्य प्रबोधनात्मक नाटिका सादर करण्यात आल्या मुलांनी सलग चार तास आपल्या कलाविष्काराच्या जोरावर सर्व पालक ग्रामस्थ तसेच मान्यवरांना अक्षरशः खिळवून ठेवले सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून त्यांची मने जिंकली कार्यक्रमावर खुश होऊन रसिकांनी कार्यक्रमावर बक्षिसांचा पाऊस पडला संपूर्ण कार्यक्रमात 28 कलाविष्कार सादर करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी सांगोला महिला सूतगिरणीच्या चेअरमन कल्पनाताई शिंगाडे सरपंच सौ उमाताई इंगवले गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब नुकतीच एमडी मेडिसिन साठी निवड झालेले डॉक्टर मयूर रुपनर माजी सरपंच विजय बापू इंगवले यांनी उपस्थिती लावून मनापासून शुभेच्छा दिल्या शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी साहेब केंद्रप्रमुख श्री मठपती साहेब यांनी फोन संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या केंद्रीय मुख्याध्यापक राजेश गडहिरे संघटना प्रतिनिधी अमोघ सिद्ध कोळी मोहन गोडसे शैलेश चांदोले चंद्रकांत पवार अविनाश कुलकर्णी रमेश कोळेकर नामदेव इंगवले सर पंडित पाटील सर यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या तसेच मुख्याध्यापक बाळाबाई सहशिक्षक राजेंद्र पाटील गुरुजी अंगणवाडी सेविका संगीता वाघमारे मॅडम यांचा सत्कार केला.

सदर कार्यक्रम पाहण्यासाठी बुरलेवाडी मेडशिंगी परिसरातील सर्व ग्रामस्थ पालक विविध संस्थांचे पदाधिकारी केंद्रातील शिक्षक हायस्कूलचे शिक्षक तालुक्यातील शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच लहान थोर असंख्य मंडळींनी हजेरी लावली या कार्यक्रमास सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाची गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब विस्तार अधिकारी अमोल भंडारी साहेब श्री कुमठेकर साहेब मेडिसिन केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमतपती साहेब शाळा व्यवस्थापन समिती तसेच अनेक शिक्षण प्रेमी बुरलेवाडी या सर्वांची प्रेरणा मिळाली सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती पालक मुख्याध्यापिका श्री बाळाबाई वाघमोडे मॅडम सहशिक्षक राजेंद्र पाटील गुरुजी अंगणवाडी सेविका संगीता वाघमारे मॅडम मदतनीस जयश्री माने आरती पवार मॅडम सौ प्राजक्ता इंगवले यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या शैलीत सर्वांना मंत्रमुग्ध करत विद्यामंदिरचे स्कॉलरमेकर शिक्षक श्री आशुतोष नष्टे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाटील गुरुजी यांनी केले.

 

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here