मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. एकट्या पुण्यातून जवळपास 75 हजार महिलानी पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार करण्यात आलाय. हे पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते. मात्र आता ज्या अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे, अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केलीय. अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्या आहेत.
अपात्र ठरवण्यात आलेल्या लाडक्या बहिणी कोणत्या?
▪️संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला – 2,30,000
▪️वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला – 1,10,000
▪️कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,०००
▪️एकुण अपात्र महिला – ५,००,०००
सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे !
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत
एकट्या पुण्यातुन जवळपास ७५ हजार महिला पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू
हे पैसे परत घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हेड तयार
हे पैसे परत घेण्यासाठी आतापर्यंत हेड नव्हता त्यामुळे पैसे घेता येत नव्हते
आता जे अपात्र महिला लाभार्थी आहेत त्यांचे पैसे परत घेण्यासाठी हेड तयार करण्यात आला आहे
त्यामुळे ज्यांच्या घरी वाहन आहे किंवा इतर योजनांचा लाभ घेतला आहे अशा अपात्र अनेक महिलांनी पैसे परत करायला सुरुवात केलीय
अपात्र असताना ही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते या भितीने अनेक महिला पैसे परत करण्याच्या तयारीत
अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर पैसे परत करण्यासाठी रांगा सुरु
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक