कोमल चव्हाण हिची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): कोमल संजय चव्हाण हिच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस,तिचा खडतर प्रवास संपला व आनंदाचा प्रवास सुरू झाला तो म्हणजे पोलीस भरती या क्षेत्रात चार वर्ष प्रयत्न करत होती खूप मेहनत घेतली दोन भरत्या मध्ये ती अपयशी ठरली तरीही तीने प्रयत्न सोडला नाही.घरच्यांनी खूप तिला सपोर्ट केला हे सगळं श्रेय तिच्या घरच्यांना देत आहे. त्यांनी तिच्यासाठी खूप खूप कष्ट सोसले आहे.अनेकांचे टोमणे ही ऐकले आहेत .दोन ते तीन वर्षे अकॅडमी चा खर्च हा तिच्या वडिलांनी नाजूक परिस्थिती असतानाही केला ,त्यांनी प्रयत्न सोडू नको मी आहे असं बोलत तिला खूप सपोर्ट केला. शेवटी झाले मुंबई पोलीस. म्हूणन तिची नियुक्ती झाली.

याचाच विचार करून सामाजिक कार्यकर्ते व नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष रघुनाथ गुजले व त्यांच्या पत्नी सुनीता गुजले यांनी तिच्या प्रयत्नाला आणखी यश मिळण्यासाठी हंगीरगे या तिच्या गावी तिचा सत्कार केला व तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे कार्यकर्ते, तिचे आई वडील व समाज व ग्रामस्थ उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here