सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आयडी काढून घ्यावा असे आवाहन तहसीलदार संतोष कणसे यांनी केले.
पुढे बोलताना तहसीलदार कणसे म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी फार्मर आयडी गरजेची आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपले सरकार सेवा केंद्र येथून फार्मर आयडी तयार करावी. ज्यांच्याकडे फार्मर आयडी असेल त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास सुलभ जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करावी. फार्मर आयडी साठी कागदपत्रे आधार कार्ड मोबाईल (मोबाईल क्रमांक आधार कार्ड लिंक असावा.) मोबाईल क्रमांक हा बँक खात्याशी लिंक असावा. सात-बारा नमुना आठ अ आदी कागदपत्रे यासाठी आवश्यक अनिवार्य आहेत. सात-बारा आधार लिंक करा सर्व शेतकऱ्यांना ग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सात-बारा आधार लिंक करायचा आहे. लिंक झाल्यानंतर एक फार्मर आयडी तयार होईल. त्यानंतर पीक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पीक अनुदान योजनेचा लाभ मिळणे सोयीचे होणार आहे.
ज्यांच्याजवळ फार्मर आयडी राहणार नाही, त्यांना या विविध योजनेचा लाभ मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. शेतकयांच्या शेतांचा, आधार संलग्न माहिती संच, शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच तसेच शेताचा भूसंदभर्भीकृत यांचा माहिती संच एकत्रितरीत्या तयार करणे व सातत्याने अपडेट करणे, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासह अन्य बाबींसाठी या अॅग्रीस्टॅकचा उपयोग होणार आहे, असे तहसीलदार संतोष कणसे यांनी शेवटी सांगितले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक