छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी शिवसेना सोलापूर जिल्हा, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सांगोला तालुका व खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष सुरज काळे यांनी दिली.
सदर शिबिराचे आयोजन गुरुवार दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ पर्यंत कर्मवीर नगर रस्ता क्रमांक दोन समोरील विद्यार्थी शिवसेना कार्यालय वासुद रोड, सांगोला येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात स्त्री रोग, सर्जरी,मेडिसीन, अस्थिरोग,बालरोग विभागातील प्रसुती,बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे,गर्भ पिशवी काढणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सिझेरीयन, गभर्भाशयाची पिशवी साफ करणे,अपेंडिक्स, हर्निया व हायड्रोसील न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी,मुत्रविकार, मुतखड्यावर निदान व उपचार अल्सर कॅन्सर रोग निदान व सल्ला,किडनीचे विकार टॉन्सिल,नाकातील हाड काढणे,मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया, दमा, मधुमेह विषबाधा, सर्पदंश,हृदयरोग,उच्चरक्तदाब, अर्धांवायू, कमी दिवसाचे बाळ कावीळ झाली असल्यास, न्युमोनिया लहान बाळाच्या ऑपरेशनची सोय, न्युमोनिया, थायरॉईड यासहित विविध आजारांवर तपासणी करून मोफत उपचार केले जाणार आहेत. तरी सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक