सांगोला येथे गेली २७ वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या वाघमारे सरांचे कराटे क्लासचेे मार्गदर्शक श्री सुनील वाघमारे सरांना शहाणबाग बहुउद्देशीय या संस्थेद्वारे राजे छत्रपती आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी वारणा मल्टीपर्पज हॉल, सांगली येथे संपन्न झाला.
आत्तापर्यंतच्या कराटे क्षेत्राच्या अतुलनीय योगदानाबद्दल आदर्श शिक्षक राजे छत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सुनील वाघमारे सर हे सांगोल्यातील मुला मुलींना कराटे क्षेत्रात गेली 27 वर्षापासून मार्गदर्शन करीत आहेत.आत्तापर्यंत वाघमारे सरांनी सांगोल्यातील मुलांना मार्गदर्शन करून सांगोल्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवले आहे.
वाघमारे सर हे सध्या सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याआधीही वाघमारे सरांना सरगवासी सवडलाल साहू बहुउद्देश्य संस्था नागपूर यांच्याकडून गोवा येथे सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या यशाबद्दल कराटे क्षेत्रात आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थी, पालक वर्गातून राजकीय वैद्यकीय क्रीडा क्षेत्रातून शैक्षणिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा येत आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक