प्रतिनिधी (शशिकांत कोळी):प्राथमिक आश्रम शाळा घेरडी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगोला तालुकाध्यक्ष, उद्योगपती अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विलास पाटील सर होते.
प्रथम मंथन,अक्षरगंगा व इतर स्पर्धापरीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या प्रशालेतील विद्यार्थी व विध्यार्थिनींचा अनिलनाना खटकाळे यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रशास्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले, त्याचबरोबर मा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांच्या संकल्पनेतून पार पाडलेल्या क्रीडा स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून धावण्याच्या स्पर्धेत उज्वल यश संपादन केलेल्या कुमारी छकुली घुटुकडे, चि,सक्षम निलेश जगधने, व अभिमन्यू सुनील अवताडे यांनाही श्रीयुत खटकाळे यांच्या हस्ते प्रशास्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले, त्याचप्रमाणे जिल्ह्यात 1 ला क्रमांक पटकवलेल्या लंगफी संघाच्या व कबड्डी संघाच्या सर्व विध्यार्थ्यांना प्रशास्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर प्रशालेत छ, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात झाली, ही स्पर्धा 3 गटात झाली व स्पर्धेत पाहिला, दुसरा, व तिसरा क्रमांक काढून त्या विध्यार्थ्यांना प्रशळेकडून प्रशास्तीपत्रक व वह्या, पेन वगैरे बक्षीस देण्यात आले, मुलांची व मुलींची प्रभावी झालेली भाषणे ऐकून खूष झालेल्या अनिलनाना खटकाळे यांनी मुलांना प्रोत्साहन मिळावे व जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभाग नोडवावा यासाठी सहभागी सर्वच 30 स्पर्धकांना प्रत्येकी 100 रुपयांचे बक्षीसही दिलेबक्षीस वितरणानंतर मुख्याध्यापक पाटील सर यांचे अध्यक्षीय भाषण झाले शिवरायांचे आचार विचाराच्या मार्गाने विध्यार्थ्यानी मार्गक्रमण करावे, असे झाले तरच भावी पिढी सशक्त असेल, आणि तरच महाराष्ट्र सशक्त असेल याव्ही जाणीव विध्यार्थ्यांना करून दिली, याप्रसंगी पालक निलेश जगधणे निवृत्ती औताडे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक