शेतकरी ओळखपत्रासाठी कॅम्प लावून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करा- रविराज शेटे यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी

0

सांगोला (प्रतिनिधी): राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभमिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या असे आवाहन शासनातर्फे सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांनी केले आहे, परंतु यासाठी तहसीलदारांनी आघाडी घेऊन, फार्मर आयडी नोंदणीला गती देण्यासाठी प्रशासनाने गावोगावी कॅम्प लावावेत किंवा जि.प. गटानुसार कॅम्प लावून किंवा घरोघरी फिरून फार्मर आयडी ची नोंदणी करावी अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे अध्यक्ष रविराज शेटे यांनी निवेदनाद्वारे सांगोला तहसीलदार यांचेकडे केली आहे.

शेतकऱ्यांना शेतातील सर्व कामे सोडून फार्मर आयडी साठी दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे व सेतू कार्यालयात हेलपाटे मारून फार्मर आयडी साठी रुपये ५० ते रुपये शंभर मोजावे लागत आहेत यातच सर्वर डाऊन च्या सातत्याने तक्रारी आहेत व यात शेतकऱ्यांचा पैसा व वेळ खर्ची पडत आहे. तसेच शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेती, पाणी, मशागत आणि जनावरे वाऱ्यावर सोडून शेतकरी नोंदणीसाठी भटकंती करीत आहे व शेतकऱ्यांना विविध लाभ मिळणार नसल्याचा इशारा देण्यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. तर नोंदणी वाढविण्यासाठी भीती दाखवणे ऐवजी शेतकऱ्यांना सहकार्याची भूमिका प्रशासनाने घेणे गरजेचे आहे व घरोघरी फिरून अगर प्रत्येक जिल्हा परिषद गटात दिवस निश्चित करून सर्व यंत्रणेद्वारे कॅम्प आयोजित करावेत म्हणजे शासनाचे, प्रशासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल व शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जाण्यापासून वाचेल तरी शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांना त्रास होणे ऐवजी त्यांची गैरसोय दूर करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी व शेतकऱ्यांच्या ओळखपत्राच्या नोंदणीची गैरसोय दूर करावी अशी मागणी ही सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे रविराज शेटे यांनी केली आहे.

यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे संघटनेचे उपाध्यक्ष सचिन धांडोरे, बबन चव्हाण, सचिव दत्तात्रय पवार, सहखजिनदार समाधान धांडोरे, सदस्य विनोद चंदनशिवे उपस्थित होते.

शेतकरी ओळखपत्रासाठी किंवा फार्मर आयडी साठी पैसे लागत नाहीत व लवकरच आपण कॅम्प किंवा घरोघरी फिरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करून ओळखपत्र तयार करण्याच्या सूचना देत आहोत. व फार्मर आयडी साठी पैसे अगर कोणती तक्रार असल्यास आपणास समक्ष भेटा.

– तहसीलदार संतोष कणसे

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here