सांगोला ( प्रतिनिधी )- अॅड. सारंग विलास वांगीकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यासाठी ५ हजार २५ रुपयांची देणगी दिली.
अॅड. सारंग विलास वांगीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर येथील न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपुलकी प्रतिष्ठानला ५ हजार २५ रुपयांची देणगी मंगळवारी सायंकाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी आपुलकीचे सचिव संतोष महिमकर, सदस्य दत्तात्रय नवले, अरविंद केदार, महादेव दिवटे, अच्युत फुले, डॉ. अनिल कांबळे, रविंद्र कदम, सुभाष पाटोळे, चंद्रशेखर कवडे, सोमनाथ सपाटे सर आदी उपस्थित होते.
आपुलकी प्रतिष्ठान सांगोला ही संस्था गेल्या सहा वर्षापासून कार्यरत आहे. धर्मादाय आयुक्त सोलापूर यांच्याकडे नोंदणी झालेली ही संस्था असून या संस्थेला कर सवलत साठी आवश्यक असलेले ८० जी सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहे. सध्या अनेक देणगीदार सामाजिक बांधिलकी जपत आपुलकीला देणगी देऊन सामाजिक कार्याच्या या चळवळीत सहभागी होताना दिसत आहेत. वांगीकर कुटुंबियांनी दिलेल्या या देणगीबद्दल वांगीकर कुटुंबियांचे आपुलकीच्या वतीने आभार मानण्यात आले.
आपुलकी प्रतिष्ठानचे चालू असलेले सामाजिक कार्य अत्यंत प्रभावी असे असून सांगोला तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून योग्य वेळी योग्य मदत ही संस्था करते. समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्या या संस्थेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
– अॅड. सारंग वांगीकर
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक