प्रतिनिधी (शशिकांत कोळी): थोर मराठी साहित्यिक,ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. वा.शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून लक्ष्मीदेवी विद्यामंदिरमध्ये विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.
प्रशालेत कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक, मराठीचे प्रा. सुभाष आसबे, प्राचार्य हेमंत आदलिंगे, मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महांकाळ,पर्यवेक्षिका सौ.सुषमा ढेबे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यानंतर प्रशालेतील काही विद्यार्थिनींनी अभंग ,गवळण तसेच मराठी राजभाषा दिनाची माहिती आपल्या भाषणातून व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ सविता भोसले मॅडम यांनी केले . मराठी विषयाचे प्रा. आसबे सरांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेविषयी आपुलकी व्यक्त केली. अनेक थोर मराठी विचारवंत ,साहित्यिक ,लेखक , कवींनी लिहिलेल्या कविता , पुस्तके,कादंबऱ्या,आत्मचरित्र वाचण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करून आपले लेखन कौशल्य , वाचन कौशल्य विकसित करण्यास सांगितले . तसेच हृदयस्पर्शी काव्यवाचन सुद्धा केले .प्रशालेच्या सहशिक्षिका सौ.रत्नप्रभा साळुंखे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक