सांगोल्यातील नीलकंठ शिंदे, सुखानंद हळळीसागर सर यांची गाडीवर प्रयागराज यात्रा

0

144 वर्षानंतर महाकुंभ मेळावा शाही स्नानाचा योग आल्याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळाव्यात गंगा व यमुना नदीच्या संगमावर भरलेल्या मेळाव्यात नागा साधूसह देशभरातून कोट्यावधी नागरिक शाही स्नान करत आहेत.

सांगोल्यातील सुखानंद हळळीसागर सर व निलकंठ शिंदे सर यांनी दुचाकीवर सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचा प्रवास करत प्रयागराज गाठत शाही स्नान व नर्मदा परिक्रमा करत आपली इच्छा पूर्ण केली.

आपणही प्रयागराज येथे जाऊन महाकुंभ मेळाव्यात शाही स्नान करावे ही इच्छा या दोघांची मनोमन होती त्यांनी प्रयागराज येथे शाही स्नानाला जाण्यासाठी अनेक मित्रांना विचारले पण कोणीच तयार होत नव्हते.रेल्वेचे बुकिंग मिळाले नाही पण जिद्द मात्र कायम होती शेवटी प्रयागराजला 9 फेब्रुवारी रोजी सांगोल्यातून दुचाकी वर निघून माघी पौर्णिमेदरम्यान हा प्रवास पूर्ण करत प्रयागराजला पोहोचले आणि आपली इच्छा पूर्ण केली.

याबाबत नीलकंठ शिंदे सर म्हणाले प्रयागराजला महाकुंभ मेळाव्यात शाही स्नानाला जायचे आहे हा निश्चय संकल्प होता फक्त धाडस करणे गरजेचे होते.

सांगोल्यातून ध्यान मंदिरातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सकाळी दर्शन घेऊन सदरचा प्रवास पूर्ण होऊन परत आण एवढेच मागणी महाराजांना मागून मोटरसायकलचे कीक मारून आम्ही प्रयागराजकडे प्रवास सुरू केला.

बाळे (खंडोबा दर्शन) सोलापूर, तुळजापूर, येहळेगाव, उमरखेड, नांदेड, माहूरगड, ऊनकेश्वर, वरोरा (आनंदवन), उपराजधानी नागपूर शहर दर्शन, रामटेक, भेडाघाट जबलपूर,मैहर, कटनी, रिवा येथील धार्मिक दर्शन व पर्यटन करत आम्ही उत्तर प्रदेशातील प्रयाग गंगा नदीच्या संगमावर शाही स्नान केले व मनात असलेले स्वप्न पूर्ण केले.

त्यानंतर आम्ही नर्मदा परिक्रमेच्या प्रवासाकडे प्रस्थान ठेवले मागील वेळी सुखानंद हळीसागर सर यांची अपूर्ण राहिलेली नर्मदा परिक्रमा अमरकंटक (मध्य प्रदेश) येथून सुरुवात करून ओंकारेश्वर या ठिकाणी नर्मदा परिक्रमेची सांगता 22 फेब्रुवारीला आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि मंदिरातील साधकांच्या साथीने आम्ही सांगोल्यामध्ये सुखरूप पोहोचलो.

 

सदर प्रयागराज व नर्मदा परिक्रमा यात्रा मोटरसायकलवर सुखरूपपणे पूर्ण केल्याबद्दल सांगोल्यातील सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन करून या धाडसी प्रवाशाचे कौतुक केले.

 

एकाच दिवसात चारशे किलोमीटरचा टप्पा पूर्ण

सांगोला ते प्रयागराज (उत्तर प्रदेश) या प्रवासादरम्यान प्रथमदिनी सांगोला ते येहळेगाव (हिंगोली) 425 किमीचे अंतर सुमारे नऊ तासात पूर्ण केले.त्यामुळे आमचा विश्वास वाढला त्यानंतर आम्ही दिवसागणिक गाडी चालवण्याचा विश्वास बळावला त्यामुळे संपूर्ण प्रवासाची टप्पा सहजरित्या विना अडथळा यशस्वीरित्या पूर्ण केला दुचाकी वर जाण्याचा फायदा प्रयागराज मध्ये वाहनांची तुफान गर्दी असल्याने आमची दुचाकी थेट संगमावर शाही स्नानाकरिता करता थेट पोहचली.

यामध्ये आम्ही अनेक धार्मिक स्थळ पर्यटन स्थळांना व वरोरा (चंद्रपूर) येथील महारोगी सेवा समितीने आनंदवन येथील कृष्टरोगांसाठी चालवलेले काम पाहून समाधान झाले व त्यामुळे पुढील सामाजिक कार्यास प्रेरणा मिळाली.

– निलकंठ शिंदे सर, सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here