प्रतिनिधी (शशिकांत कोळी): ८ मार्च जागतिक महिला दिन लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलात दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील उत्साहात साजरा करण्यात आला.महिला पालकांना त्यांच्या दररोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळण्यासाठी पाककला स्पर्धा आयोजित केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या डाॅ.स्मिता गव्हाणे व प्रमुख उपस्थिती संस्था सदस्या सौ. रजनी भोसले,मुख्याध्यापिका सौ.पुष्पा महांकाळ, पर्यवेक्षिका सौ.सुषमा ढेबे, पर्यवेक्षक सुभाष आसबे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होता.
पाककला स्पर्धेमध्ये महिला पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला. सर्वांनीच खाऊंचे पौष्टिक पदार्थ आणले होते. त्याची व्यवस्थित सजावट आणि सादरीकरण उत्तम केले. डाॅ.स्मिता गव्हाणे, सौ.रजनी भोसले यांनी या स्पर्धेतून तीन पाक कलेचे सर्वोत्तम क्रमांक काढले.
प्रथम क्रमांक – सौ.सुवर्णा प्रभाकर गायकवाड,
द्वितीय क्रमांक सौ. राणी सुनील पवार,
तृतीय क्रमांकामध्ये सौ.सुनीता हेमंत जाधव आणि सौ.शोभना विजय भिंगे यांना विभागून देण्यात आला.पूर्वी आजारी पडल्यानंतर हुलग्याचे माडगे केले जायचे तसेच माडगे,शेवग्याच्या शेंगाचे सूप ,फ्रुट कस्टर्ड,विविध प्रकारचे स्नॅक्स ,शेवया तसेच तांदळाची खिर व्हेज बिर्याणी,ढाबा स्टाईल भाज्या, त्याबरोबरच बरेच नवनवीन पदार्थ बनवले होते. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच महिलांना,शाळेतील महिला सेविकांना सौ. रजनी भोसले यांचेकडून आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
डाॅ.गव्हाणे मॅडम यांनी त्यांच्या मनोगतातून महिलांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहणेसंबंधी महत्वपूर्ण माहिती दिली. या प्रशालेमध्ये वारंवार महिलांच्या आरोग्याबाबत चर्चासत्र होत असतात त्या चर्चासत्रांना सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. महिलांनी पौष्टिक आहार , व्यायाम याबाबत जागरुक राहावे .संसारामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांचे देखील महत्व आहे. याची विविध उदाहरणे त्यांनी पटवून दिली.याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
पाल्याच्या अभ्यासाबरोबर महिला पालकांना सुद्धा हळदी कुंकू, विविध मनोरंजनपर व कलागुणांना वाव देण्यासाठी लक्ष्मीदेवी विद्यामंदिर सदैव तत्पर असते .स्त्रियांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी कायम प्रशालेमध्ये आरोग्य शिबीरे राबवली जातात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा ढेबे यांनी व आभार सौ पुष्पा महाकाळ यांनी मानले . सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व महिला शिक्षक, सेवक व सेविका यांनी खूपच छान सहकार्य केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक