सावित्रीबाई फुले प्रशाला सोनंद येथे शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महिला पालकांमध्ये विविध आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा ठेवल्याने कमालीचा उत्साह दिसून आला. डॉक्टर वैशाली काशीद यांचे “सोशल मीडिया “व “मिळूया साऱ्या जणी “या विषयावर व्याख्याने आयोजित केलेले होते.यश अपयश पचवता आले पाहिजे, स्त्रियांनी पुरुषाला खंदाला खांदा लावून प्रत्येक शिखरे सर केली तरीही स्त्री ही स्त्री असते. चार पावले मागे सरला हरकत नाही. सर्व स्त्रियांनी इन्स्टा मोबाईल यावर मनाचे नियंत्रण ठेवावे. आपली कुटुंब व्यवस्था मेंटेन करावी नातेसंबंध घट्ट करावेत सगळेजण एकमेका शी सहकार्याने गेल्यास भारत महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही असे मत व्यक्त केले.
सहशिक्षिका तबसूम इनामदार आणि श्रुतिका काशीद यांनी माता पालकांसाठी सामर्थ्यशाली गट, महत्वकांक्षी गट ,रणरागिनी गट, संयमी गट असे गट तयार करून आगळे वेगळे चित्रावरून म्हणी पूर्ण करणे बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न मंजुषा आणखी हस्त कौशल्याचे अनेक मनोरंजक खेळ घेतले यामध्ये सामर्थ्यशाली गट प्रथम तर महत्वकांक्षी गट द्वितीय संयमी गट तृतीय असे पालकांनी क्रमांक पटकावले मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शेडसाळे यांनी माता पालकांनी सध्या मुलांचे जे शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य आहे त्याविषयी चिंता व्यक्त केली व प्रत्येक पालकांनी मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे मुलांचा स्क्रीन टाईम याकडे लक्ष देणे किंवा सध्या शिक्षण खात्याने जी कॉपीमुक्त अभियान जोमाने सुरू केले आहे ते तसेच पुढे नेले पाहिजे त्यादृष्टीने समुपदेशन केले इयत्ता सातवीच्या मुलींनी व आठवीच्या मुलींनी उत्कृष्ट असे गणेश वंदना व स्वागत गीत सादर केले.
संस्थापक अध्यक्ष श्री डी डी कोळसे पाटील यांनीही कार्यक्रमास उद्घाटन प्रसंगी हजर राहून मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्री राजू पाटील यांच्या मातोश्री सौ सुलाबाई बापू काशीद यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी प्रत्येक वर्गातून एक माता पालक यांची निवड मुख्याध्यापिका यांनी केलेली होती त्यांनाही भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले यापैकी आदिती भूसनूर, जानवी भोसले, सेजल गळव, सायली बोराडे, श्रावणी रुपनर, विद्या निकम याच्या माता पालकांचे प्रशालेतर्फे कौतुक करण्यात आले.याप्रसंगी शिक्षण खात्याकडून दिलेल्या रेसिपी स्पर्धेचेही आयोजन केले होते. यामध्ये सौ अक्काताई गळवे व सौ राधिका कोळसे यांचा प्रथम द्वितीय क्रमांक आला तर सविता कोळसे पाटील यांनी आणलेली पौष्टिक पदार्थांची थाळी विशेष लक्षवेधी होती.आदरणीय केंद्रप्रमुख श्री तानाजी साळे सर अत्यावश्यक कामामुळे हजर राहू शकले नाहीत पण त्यांनी दूरध्वनी वरून शुभेच्छा दिल्या सौ.सरीता कोळसे पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.महिलांना अल्पोपहार नियोजनामध्ये सौ मनीषा ठोकळे व सेवक बाजीराव घाडगे यांनी मोलाचे योगदान दिले सहशिक्षक श्री तांबोळी सर यांनीही खूप मोलाचे सहकार्य केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक