सांगोला (प्रतिनिधी): दि.29 सप्टेंबर 2024 रोजी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पनवेल येथे अखिल भारतीय खुल्या कराटे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एकूण सांगोल्याचे आठ मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासने एकूण दहा पदके मिळवून यश संपादन केले.
यापैकी कता प्रकारात यश कोकरे ,आशिष कोकरे निजेन्द्र चौधरी यांनी सुवर्णपदक, रोहित अरबळी शिवराज कळसुले यांनी रौप्य पदक, तेजस कांबळे सिद्धार्थ माने अभयसिंह ऐवळे यांनी कांस्यपदक मिळविले.(फाईट) कुमीते प्रकारात तेजस कांबळे याने रौप्य पदक तर सिद्धार्थ माने, आशिष कोकरे, यश कोकरे यांनी कांस्यपदक पटकाविले.
सर्व विद्यार्थ्यांना श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सांगोल्यातील कराटे क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शैक्षणिक कला क्रीडा आदी क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक