सांगोला (प्रतिनिधी): दि. ०८ मार्च रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे महिला कल्याण समिती यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त “कळी उमलताना” हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिटी मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक सांगोलाच्या डॉ. झीनत तांबोळी या उपस्थित होत्या. व अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या डॉ.सौ. सीमा गायकवाड या उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. झीनत तांबोळी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनामध्ये कसे वागले पाहिजे तसेच स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांमध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12 यांचा अभाव कशामुळे होतो याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन केले. महिला या स्वतःची काळजी घेत नाहीत असे ही त्यांनी सांगितले. तसेच सध्याच्या युगामध्ये फास्ट फूडला महिलांकडून प्राधान्य दिले जाते त्यामुळे अनेक रोगांना महिलांना बळी पडावे लागते .तसेच विद्यार्थिनींनी आई-वडिलांबरोबर किंवा शिक्षकांबरोबर संवाद साधला पाहिजे जेणेकरून समस्येचे निराकरण होईल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. सीमा गायकवाड यांनी सर्वाइकल कॅन्सरबद्दल विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थिनींना आत्मनिर्भर होण्यावर भर दिला पाहिजे असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.सौ. अश्विनी सूर्यवंशी व आभार प्रा. दिपाली गोडसे केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला कल्याण समितीच्या चेअरमन प्रा.सौ.मिनाक्षी धुरे व कमिटी सद्स्या प्रा. सौ. प्रणाली माळी, प्रा.सौ. तनुजा कोकरे, प्रा.सौ. आयेशा तांबोळी व सर्व महिला स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक