स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील 55 शिक्षीकांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये सोलापूरच्या सेवासदन प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. सुविद्या नवनाथ काळेल यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच मुख्यमंत्री सहाय्यता आरोग्य कक्षाचे प्रमुख मा.मंगेश चिवटेसाहेब व सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी मा. सचिन जगताप साहेब, मा. मनीष अण्णा काळजे तसेच स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. बापूसाहेब अडसूळ व प्रदेश कार्याध्यक्ष मा.डॉ. दत्तात्रय काळेल यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे.
सौ . सुविद्या काळेल या सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब करांडे यांच्या कन्या आहेत. त्यांचे या यशाबद्दल ग्रामीण व शहरी भागातून सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक