प्रतिनिधी (शशिकांत कोळी): घेरडी, ता. सांगोला, जि. सोलापूर. येथील शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कडे पाण्याची मागणी करून 2 महिने होऊन गेले.तरी सुद्धा घेरडी हद्दीतील पाणी आले नाही.सदर पाण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत डी.डी. काढले असून तरी सुद्धा अधिकारी पाणी सोडण्यास टाळा टाळ करीत आहेत.
या संदर्भात तहसीलदार सांगोला,कार्यकारी अभियंता सांगोला, सांगोला तालुक्याचे विदयमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना घेरडी शेतकरी यांच्या वतीने निवेदन दिले असून आमदार साहेब यांनी म्हैशाळचे अधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून त्यांना दोन दिवसात पाणी सोडू असे सांगितले आहे तरी आम्हास दोन दिवसात पाणी मिळावे अन्यथा दि 17 मार्च 2025 रोजी पासून पाणी मिळे पर्यंत सहाय्यक कार्यकरी अभियंता म्हैशाळ कालवा क्रमांक 1 सांगोला येथे उपोषणास बसणार आहोत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक