माणभुमी महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला व माणभुमी फाउंडेशन यांचे संयुक्त विदयमाने सांगोला येथे महिला सन्मान सोहळा व वर्धापन दिन संपन्न

0

दिनांक ७ मार्च रोजी माणभुमी महिला अर्बन को. ऑप. केडीट सोसायटी लि. सांगोला व माणभुमी फाउंडेशन यांचे संयुक्त विदयमाने सांगोला येथे महिला सन्मान सोहळा व वर्धापन दिन संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ. मिरा अंकलगी मॅडम व अॅड. सौ. अश्विनी बिपीन मोहीते उपस्थित होते.

संचालिका सौ. तेजश्री विधीन कांबळे यांनी माणभुमी महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला या पतसंस्थेची थोडक्यात माहीती देवुन महीला दिनाचे महत्व सांगुन कार्यकमाचे प्रास्ताविक केले.

विविध क्षेत्रातील यशस्वी महीलांचा सन्मान व सत्कार करणेत आला. यावेळी माजी सैनिक विरपत्नी श्रीमती तारूबाई रामचंद्र दोडकुले, बचत गट संघटक सौ. फातिमा मणेरी बचत गट संघटक सौ. शमशाद मुजावर यांचा सन्मान व सत्कार करणेत आला.

कार्यकमाचे प्रमुख पाहुणे सौ. मिरा अंकलगी मॅडम यांनी महीला ही कुटुंबाचा आधार असुन सक्षम महीला कशा प्रकारे कुटुंबाच्या विकासाची तसेच समाजाचे विकासाची धुरा यशस्वीपणे सांभाळते याची माहीती देवुन समाजात काम करताना महीलांचे पुढे असणारे विविध अडचणी व समस्या व त्यांचे निराकरण यांची माहीती देवुन मार्गदर्शन केले. सल्लागार अॅड. अश्विनी बिपीन मोहीते यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून समाजातील भविष्यातील आर्थीक समस्या व उपाय याची माहीती देवुन मार्गदर्शन केले. कार्यकमाचे अध्यक्ष माणभुमी महीला अर्बन को. ऑप. के. सोसायटीचे चेअरमन सौ. आरजुमंदबानु पटेल यांनी महीला बचत गटाचे माध्यमातुन समाजाचा व कुटुंबाचा सर्वांगीण उत्कर्ष व आर्थीक विकास करू शकते याचे मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ.सौ. आसमा सैफुनहसन तांबोळी संचालिका सौ. अश्विनी राजु कोळेकर, श्रीमती सुनिता सुनिल जाधव, सौ. संगिता शिवाजी गडदे तसेच उपस्थित महीलांनी मनोगत व्यक्त केले संचालिका सौ. मनिषा वैभव जांगळे, सौ. आयेशा इब्राहीम मणेरी सौ. माधुरी अमर जाधव सौ. शुभांगी समाधान शिंदे सौ. दिलशाद नुरमहंमद मणेरी उपस्थित होते.

माणभुमी फाउंडेशन व माणभुमी परीवारचे प्रथम वर्धापन दिनाचे निमीत्ताने माणभुमी परीवारचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अयुब पटेल यांनी यावेळी माणभुमी परीवारची संकल्पना व कार्य याची माहीती देवुन संस्थेच्या नियोजीत उपकमांची माहीती दिली. यावेळी माणभुमी परीवारचे सदस्य व संचालक डॉ. सैफुनहसन तांबोळी, डॉ. वैभव जांगळे, प्रा.डॉ. विधीन कांबळे, ऑडीटर इब्राहीम मणेरी, अमर जाधव, शिवाजी गडदे, समाधान शिंदे सर, राजु कोळेकर, नुरमहंमद मणेरी, आतिष जाधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करणेकरीता अरहान पटेल, सौ. अश्विनी सरगर, सौ. सिमा गोंजारी, सचिन आगरकर व माणभुमी परीवारचे सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमास संस्थेचे सदस्य, कर्मचारी सभासद व महीला वर्ग बहुसंख्येनी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here