प्रतिनिधी (शशिकांत कोळी): !! तुका म्हणे माझे सर्व सुख! पाहिलंस श्रीमुख आवडीने!!
सालाबाद प्रमाणे याही वर्षी घेरडी येथील वेताळवाडी या ठिकाणी रविवारी दिनांक 16 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या बीजे निमित्त फुलाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कीर्तनकार वेदांताचार्य ह. भ. प चैतन्य महाराज रसाळ(भय्या ) पंढरपूर हे कीर्तनकार उपस्थित राहून सकाळी 10 ते 12 वाजता त्यांचे कीर्तन होणार असून 12 वाजता पुष्पवृष्टी होणार आहे. तसेच दुपारी 12 ते 1 महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन समर्थ सद्गुरु शंकर महाराज रसाळ गुरुभक्त मंडळ व रामकृष्ण हरी भोजलिंग महाराज मंडळ तसेच घेरडी ग्रामस्थ यांच्यावतीने श्री दिलीप भागवतराव मोटे माजी सरपंच यांच्या घरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेताळवाडी, घेरडी ता. सांगोला येथे करण्यात आले आहे.तरी सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी व कीर्तनासाठी तसेच महाप्रसादासाठी उपस्थित राहावे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक