आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

0

डॉ. महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

यावेळी विकास वलेकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली . तसेच डॉ आलदर हे उदनवाडी गावचे सुपुत्र असून उदनवाडीतील व सांगोला तालुक्यातील लोकांना गेले ६ वर्ष झाले २४ तास सेवा देत असून हेच आपले भाग्य असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग , लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे . गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचा त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी आरोग्य सेविका रिना कदम , रुक्मिणी सरगर, रामहरी मिसाळ , प्रियांका आलदर ,सुनीता वलेकर, अनिता साबळे, आबासो आलदर, फिरोज खान, विशाल गाडे, वर्षा गाडे, आर्यन आलदर, सुनील बुरूंगे व नितीन भोसले यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here