दिघंची (ता. आटपाडी जि. सांगली )येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात इंद्रभाग्य आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ.सरस्वती दयानंद मोरे यांना पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महिला दिनाचे औचित्य साधून स्वप्नल फाउंडेशन पुणे तर्फे मान कर्तुत्वाचा सन्मान नेतृत्वाचा असा राज्यस्तरीय महिला गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ.सरस्वती मोरे अनेक दिवसापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या कार्यरत आहेत.तसेच त्या शिक्षिका असून दिघंची येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात अध्यापनाचे कार्य करत आहेत.विशेष बाब म्हणजे त्या कवी लेखिका असून कमी कालावधीत त्यांनी साहित्यिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व मेडल देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप राक्षे सर, IG श्री मंडलिक(CID ) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले, होम मिनिस्टर खेळाचा बादशहा बाळकृष्ण नेहरकर, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मीकांत खाबिया, चला हवा येऊ द्या च्या सिने अभिनेत्री शिवकांता पवार, स्वप्नल फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ मॅडम , पैगंबर शेख डॉ. मनोज पाटील आधी जण मान्यवर उपस्थित होते. राज्यातील विविध भागातील महिला व पुरुषांची उपस्थिती वाखाणण्याजोगी होती. सर्वांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक