महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आयुक्तांना आदेश
सांगोला(तालुका प्रतिनिधी):- सांगोला येथे नेमणुकीस असणारे तहसीलदार श्री. संतोष कणसे यांची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगोला तालुका अध्यक्ष दत्तात्रय सावंत यांनी महसूल मंत्री ना .चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित चौकशी करण्याचे आदेश पुणे आयुक्तांना दिले असून तक्रार अर्जाची चौकशी करून, चौकशी पुर्ण झाल्यावर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश ही देण्यात आले असल्याची माहिती दत्तात्रय सावंत यांनी दिली. विभागीय आयुक्त चौकशीकडे आता सांगोला तालुक्याचे लक्ष लागून राहिले असून तहसीलदार, प्रशासनातील वादग्रस्त कर्मचारी व वसुलदार यांचे पाय आणखी खोलात जाणार असल्याचे चर्चेस सांगोला तालुक्यात उधाण आले आहे.
गेल्या अनेक महिन्यापासुन सांगोला येथे नेमणुकीस असणारे तहसीलदार श्री. संतोष कणसे हे त्यांचे कार्यालयात येणा-या सर्व सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणुक न देता त्यांचेवर अरेरावीची व उध्दट भाषा वापरताना निदर्शनास येत आहे. तसेच सदर तहसीलदार श्री.संतोष कणसे हे सध्या वाळु माफिया, हप्ता वसुली करणारे एजंट व ५९ माफिया यांना कार्यालयात व राहते घरी सन्मानाची वागणुक देत आहेत. ही बाब राज्याच्या हिताचे दृष्टीने अतिशय गंभीर स्वरुपाची आहे. तसेच तहसीलदार संतोष कणसे यांचे तालुक्यामध्ये बेकायदेशीर कामाचे अनेक एजंट तयार झालेले असुन रस्ता केस, कुळ कायदा केस, वाळु वाहन सोडणे, जन्म नोंद प्रकरण मंजुर करणे, ७/१२ दुरुस्ती करणे याचे वेगवेगळे एजंट तालुक्यातील अर्जदारांकडे जावुन मांडवली करत असलेची चर्चा तालुक्यात ऐकावयास मिळत आहे. रस्ता मागणी अर्जामध्ये अर्ज दाखल झालेनंतर लगेच त्यांचा एजंट संबंधित अर्जदाराकडे जावुन रस्ता पाहिजे असेल तर ५० हजार रुपये द्या अशा प्रकारची मागणी करीत असलेची चर्चा तालुक्यात ऐकावयास येत आहे.
वरीलप्रमाणे वस्तुस्थिती सध्या तालुक्यामध्ये चालु असलेची उघड चर्चा नागरिक बोलुन दाखवित आहेत त्यामुळे संबंधित तहसीलदार यांची सखोल चौकशी करुन त्याने मोबाईल सी.डी.आर, त्यांच्या मालमत्तेत झालेली वाढ, त्यांच्या सोबत असणा-या एजंटचा सुळसुळाट याची चौकशी करुन संबंधित तहसीलदार यांचेवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा तालुक्यात आहे. तरी आपण याची दखल घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्वरित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून कानउघडणी केली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून लवकरच महसूल मंत्री यांनी लवकरच सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे आश्वासन दत्तात्रय सावंत यांना दिले आहे.
सांगोल्याचे वादग्रस्त तहसीलदार यांच्या अनेक तक्रारी महसूलमंत्र्यांकडे नागरिकांनी दिल्या आहेत. तालुक्यात प्रशासनाने नेमलेले एजंटामुळे अवैद्य वाळू सह अनेक बेकायदेशीर कामे सुरू आहेत यांची कल्पना महसूल मंत्री यांना दिली आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा वचक सुद्धा तालुक्यातील अधिकाऱ्यांनी राहिला नसून बेकायदेशीर कामांसह अवैध वाळू व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या अधिकारी कर्मचारी व नेमलेल्या सर्व वसूलदारांची चौकशी करून कारवाई करणार करावी अशी मागणी मा.महसूलमंत्री यांच्याकडे केली आहे.माझ्या मागणीवर महसूल मंत्री यांनी सकारात्मक आदेश दिले असून लवकरच तहसीलदार व त्यांच्या नेमलेल्या सर्व एजंटांवर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून चौकशी होऊन कारवाई होईल.
– श्री.दत्तात्रय सावंत, तालुकाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक