आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला यश

0

टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश

टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन सोडण्याकरता आज मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील तसेच पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून माण नदीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकासाठी उन्हाळी सिंचन आवर्तन लवकरात लवकर सोडण्याची आग्रही मागणी केली.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात निर्माण होऊ शकतो त्यामुळे सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील गावांना शेती पिकासाठी सिंचन उपलब्ध करून नियोजनबद्ध पद्धतीने आवर्तन एप्रिल महिन्यात सुरू करण्यात यावे अशी आग्रही मागणी आज आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली. त्यावर जलसंपदा मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना दि. १० एप्रिल पासून शेतकऱ्यांसाठी पीक सिंचन आवर्तन सुरू करण्याचे बैठकीत आदेश दिले. सदरच्या बैठकीसाठी आ. रोहित पाटील, आ. सुरेश खाडे, आ. गोपीचंद पडळकर, आ. सुरेश बाबर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here