परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी दिला शब्द
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला एसटी आगारामध्ये सध्या 52 एसटी बसेस असून त्यातील 10 बसेस नजीकच्या काळात स्क्रॅपला जाणार असल्याने 43 बसेसवर आगाराचा कारभार चालविणे अशक्य होणार आहे. सद्यस्थितीत बस स्थानकातील डांबरीकरण खराब झाल्याने त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे या मागण्या संदर्भात सांगोला तालुक्याचे माजी आम. अॅड.शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री नाम. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे नवीन 20 एसटी बसेस देण्यासंदर्भात व विकास कामाबाबत भेटून पत्र दिले. या मागणीचा विचार करून परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी सांगोला एसटी आगारास जुलै अखेरपर्यंत नवीन 20 एसटी बसेस देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच सांगोला एसटी आगाराचे उत्पन्न ही वाढणार आहे. अशी माहिती माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
सांगोला एसटी आगारात सध्या 52 एसटी बसेस असून त्यातील 10 बसेस नजीकच्या काळात स्क्रॅपला जाणार असल्याने शिल्लक 43 बसेस एसटी आगारात अपूर्ण पडत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व प्रवासी सेवेचा विचार करता ज्यादा बसेसची आवश्यकता व गरज भासत होती त्या संदर्भात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे 20 नवीन एसटी बसेस देण्यासंदर्भात मागणी केली होती.
या मागणीचा सकारात्मक विचार करून सांगोला एसटी आगारास जुलैपर्यंत 20 बसेस देण्याचा शब्द माजी आम. शहाजीबापू पाटील यांना दिल्याने तालुक्यातील जनतेमधून आनंद व्यक्त केला जात आहे. सांगोला एसटी आगार परिसरातील परिसरातील डांबरीकरण खराब झाल्याने त्या ठिकाणी नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक