मजूर महिलेच्या मदतीला धावून आली आपुलकी!

0

डॉ. अमर शेंडे यांनी केली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी 

सांगोला ( प्रतिनिधी )-  जिथे काम मिळेल तिथे जायचे, रोजंदारी करून पोट भरायचे, त्यातच दहा वर्षापासून शारीरिक त्रास, परंतु घरी सांगायचे कसे?  या विवंचनेत असतानाच जास्त त्रास होऊ लागल्यानंतर मात्र हॉस्पिटलला जावेच लागले. आणि डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऑपरेशन करावे लागेल असे सांगितल्यानंतर पायाखालची वाळू सरकली. मात्र मोलमजुरी करणाऱ्या या महिलेच्या मदतीला आपुलकी धावून आली, त्याचबरोबर डॉ.अमर शेंडे यांनी गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केल्यामुळे तिचे जगणे आता सुकर होणार आहे.

.        मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले पवार कुटुंबीय गेल्या दोन वर्षापासून मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करण्यासाठी सांगोला तालुक्यात आले आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी बामणी येथे काम चालू असताना बेबाबाई नामदेव पवार यांना जास्तच त्रास होऊ लागल्याने त्यांनी डॉ.शिवराज भोसले व डॉ. अश्विनी केदार यांच्याकडे जाऊन तपासणी केली असता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असे सुचवले. परंतु मोलमजुरी करणारे व हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबाला ऑपरेशन साठी पैसे आणायचे कुठून? असा प्रश्न पडला. याची माहिती आपुलकी प्रतिष्ठानला मिळाल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानने मदतीचे आवाहन केले व बघता बघता आपुलकी सदस्य व समाजातील दानशूर व्यक्तींकडून २४ तासात ३५ हजार रुपये जमा करून डॉक्टरांकडे सुपूर्द केले.

डॉ. अमर शेंडे यांनी शासनाच्या सवलतीत न बसणाऱ्या व अवघड असलेल्या शस्त्रक्रियेच्या खर्चात मोठी सवलत देऊन गुंतागुंतीची  शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्याचबरोबर तीन महिन्यासाठी फेरतपासणी व औषधोपचार नि:शुल्क करणार असल्याचे तसेच यापुढे या महिलेला असा त्रास पुन्हा कधीही होणार नाही असे डॉ. शेंडे यांनी यावेळी सांगितले.

 बेबाबाई पवार यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंगळवारी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतेवेळी डॉक्टर टीम व आपुलकीचे आभार मानताना त्यांना अश्रू अनावर झाले. सांगोल्यातील आपुलकीची माणसं व डॉक्टर टीमने केलेली मदत कुठेही गेलो तरी कायम आठवणीत राहील असे त्या म्हणाल्या.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here