सांगोला (प्रतिनिधी): उन्हाळी सुट्टीत होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सांगली – मिरज – सोलापूर – सांगली रेल्वे कायमस्वरूपी दररोज सुरू करावी या मागणीचे निवेदन महाव्यवस्थापक,मध्य रेल्वे मुंबई यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले.
सांगली- सोलापूर – सांगली रेल्वे पॅसेंजर रेल्वे 10 वाजता सकाळी सत्रात सांगली येथून सुरू करावी हीच रेल्वे सोलापूर येथून सायंकाळी 5 सोलापूर येथून सोडावी. त्यामुळे मिरज,आरग,सलगरे, कवठेमंकाळ ,ढालगाव , जतरोड, डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडलिंब, कुर्डूवाडी, माढा व मोहोळ असे थांबे मंजूर करून या भागातील लोकांचे दैनंदिन मोठी सोय होईल.
या गाडीचा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांना जोडण्याचा मोठा फायदा होणार आहे.तसेच परतीच्या प्रवासात कुर्डूवाडी, पंढरपूर ,सांगोला, ढालगाव येथील प्रवाशांना दररोज गोवा( वास्को )व दिल्ली येथे जाण्याकरिता संध्याकाळी दहा वाजता मिरजेतून या गाडीतून हज.निजामुद्दीन एक्सप्रेसचे कनेक्शन मिळू शकेल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना दुपारी एक नंतर कोणतीही 18 – 20 गाडी या मार्गावर नाही तरी सदरची गाडी सुरू करणे आवश्यक आहे. तसेच सांगली – परळी या डेमो गाडीस आयसीएफ कोच डबे जोडावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.या निवेदनाच्या प्रती मा. अश्विनी वैष्णव ,रेल्वेमंत्री भारत सरकार,खासदार धैर्यशील मोहिते – पाटील ,खासदार विशाल पाटील,खासदार प्रणितीताई शिंदे,विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, नांदेड,पुणे यांनाही शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने देण्यात आले आहेत.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक