शिरभावी ग्रामस्थ व आपुलकीच्या सहकार्याने जखमी ब्रह्म क्षीरसागरच्या उपचारासाठी मदत!

0

सांगोला ( प्रतिनिधी )- २५ मार्च रोजी झालेल्या अपघातात आई-वडील जागीच मरण पावलेल्या व त्याचवेळी गंभीर जखमी झालेल्या १३ वर्षीय ब्रह्मच्या वैद्यकीय उपचार मदतीसाठी शिरभावी ग्रामस्थ व आपुलकी प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेऊन जमा केलेला मदत निधी मंगळवारी सायंकाळी क्षिरसागर कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आला.

२५ मार्च रोजी सकाळी सांगोला शिरभावी रस्त्यावर चिंचोली जवळ मोटरसायकलला पिकअपने जोराची धडक दिल्यामुळे धनंजय क्षीरसागर व त्यांच्या पत्नी जागीच ठार झाल्या होत्या, तर ब्रह्म हा तेरा वर्षीय  मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी उषःकाल हॉस्पिटल सांगली येथे दाखल करण्यात आले आहे. त्याच्या उपचारासाठी मदतीची गरज होती म्हणून शिरभावी ग्रामस्थ व आपुलकी प्रतिष्ठान यांनी सोशल मीडियावरून आवाहन केले व या आवाहनाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांच्याकडे १ लाख २१ हजार १२१ रुपये जमा झाले होते. तर शिरभावी ग्रामस्थांकडे १ लाख २९ हजार ३०० रुपये जमा झाले होते. ही सर्व रक्कम मंगळवारी सायंकाळी शिरभावी येथे क्षीरसागर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिरभावी ग्रामस्थ व आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

भाऊ ब्रह्म धनंजय क्षीरसागर याची प्रकृती सुधारत असून त्याच्यावर उषःकाल हॉस्पिटल सांगली ते उपचार सुरू आहेत. त्याच्या उपचारासाठी मोठा खर्च होणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मो. नंबर 70575 28650 वर मदत करून सहकार्य करावे, ही विनंती.

-प्रतीक्षा धनंजय क्षीरसागर ( बहीण)


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here