सांगोला (प्रतिनिधी) सांगोला येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अयुब पटेल यांची भारत सरकारच्या केंद्रीय नोटरी पब्लीक पदावर नुकतीच निवड करण्यात आली आहे. अॅड. अयुब पटेल हे मागील २५ वर्षापासुन वकिली व्यवसाय करीत आहेत. त्यांनी मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस विभागात विधी निदेशक म्हणुन सेवा बजावली असुन पंढरपुर येथील जिल्हा न्यायालय व सांगोला येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात सध्या वकीली व्यवसाय करीत आहेत.
माणभुमी फाउंडेशन सांगोलाचे ते संस्थापक अध्यक्ष असुन महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थेमध्ये विधी सल्लागार म्हणुन विधी सेवा देत आहेत. सेवाभावी भावनेने नेहमी काम करणारे व हसतमुख व्यक्तीमत्व असणारे अॅड. अयुब पटेल यांची भारत सरकारचे केंद्रीय नोटरी पब्लीक पदावर नियुक्ती झालेबददल त्यांचे सर्वत अभिनंदन होत आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक