सांगोला तालुक्यातील एकमेव मान्यता प्राप्त कराटे संघटना कराटे असोसिएशन सांगोला च्या कार्यकारी अध्यक्षपदी निजेंद्र चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. ही निवड स्पोर्ट्स कराटे डॉ असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष श्री जी के वाघमारे सर यांनी केली आहे. निजेंद्र चौधरी हे मान्यता प्राप्त राष्ट्रीय पंच आहेत व सोळाव्या वर्षी राष्ट्रीय पंच होण्याचा मान मिळविणारे व नुकत्याच झालेल्या बँन्कॉक थायलंड येथे जागतिक कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळून यश संपादन केले.
निजेंद्र चौधरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत कार्यरत आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन सांगोला तालुक्याच्या कराटे क्षेत्राला गती देण्याचं काम निजेंद्र चौधरी हे करत आहेत म्हणून त्यांची कराटे असोसिएशन सांगोल्याच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले आहे. निजेंद्र चौधरी चे शालेय शिक्षण विद्यामंदिर इंग्लिश मीडियम येथे व विद्यालय शिक्षण विद्यामंदिर जूनियर कॉलेजमध्ये झाले व सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे व कराटेचे शिक्षण हे वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्येे घेत आहे. त्याच्या या निवडीबद्दल सांगोल्याच्या कराटे क्षेत्रात अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व निजेन्द्र चे सर्वच कला क्रीडा साहित्य क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. निजेंद्र चौधरीला सतत जागतिक कीर्तीचे प्रशिक्षक कराटे चे जनक श्री सुनील वाघमारे सरांचे मार्गदर्शन लाभत आहे.निजेंद्र चौधरी हा एकमेव राष्ट्रीय कराटे मान्यता प्राप्त पंच आहे. सांगोला तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांनी निजेन्द्र चौधरी शी संपर्क साधावा आपल्या प्रशालेमध्ये महाविद्यालयामध्ये मान्यता प्राप्त कराटे संघटनेचे धडेे घ्यावेत असे आव्हान कराटे डो असोसिएशन सोलापूर चे अध्यक्ष जी के वाघमारे सर यांनी केले आहे. संपर्क 9970606909
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक