सांगोला (प्रतिनिधी): दि. 17 एप्रिल 2025 रोजी डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा समिती मार्फत सकाळी 10.30 वाजता गणिताच्या युक्त्या आणि टिप्स विषयावर मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज चे गणित विषयांचे तज्ञ प्राध्यापक तानाजी गावडे यांना निमंत्रीत करण्यात आलेले होते.
सदर मार्गदर्शन वर्गास मार्गदर्शन करताना त्यानी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना , गणिताच्या विभागाबद्दल घाबरणे सामान्य आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे स्पर्धात्मक परीक्षेत क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड ही श्रेणी जोडण्याचा मुख्य उद्देश काय आहे? मूलभूत गणितीय समस्या तार्किकदृष्ट्या सोडवण्याची तुमची क्षमता तपासणे आहे. यासाठी, पुरेसा सराव आणि परिमाणात्मक संकल्पनांचे चांगले आकलन आवश्यक आहे या बाबत मार्गदर्शन केले. जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेला बसण्याची योजना आखत असाल तर स्पर्धात्मक परीक्षांसाठी गणिताच्या प्रमुख संकल्पनांसह उपयुक्त टिप्स, युक्त्या आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी गणिताची पुस्तके सविस्तरपणे सांगून ज्या तुम्ही चांगले गुण मिळवण्यासाठी वापरू शकता या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी संख्या लक्षणीय होती.
प्रमुख पाहुण्याची ओळख स्पर्धा परीक्षा समिती चेअरमन प्रा शेख जे यू यांनी करून दिली. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा कोळवले डी एस.,प्रा शेख एन एस, प्रा बंडगर नितीन याचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे आभार समिती सदस्य प्रा रसाळ निलेश यांनी मानले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक