सावित्रीबाई फुले प्रशालेत कला प्रदर्शन संपन्न

0

सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सोनंद येथे मुख्याध्यापिका श्रीमती संगीता शेडसाळे यांच्या कल्पनेतून कला प्रदर्शनाचे आयोजन केले चालू शैक्षणिक वर्षात कले संबंधी हे तिसरे सत्र होते प्रथम सत्र मध्ये घटाची सजावट, आकाश कंदील ,पणत्यांची निर्मिती आणि या शेवटच्या सत्रामध्ये पाचवी ते आठवीतल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रात्यक्षिक कामाचे प्रदर्शन भरवले होते अनोखेआणि आगळे वेगळे प्रदर्शनास जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी भेट दिली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे-पाटील सर यांनी पालकांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन केले वाढती उष्णता व परीक्षेचा ताण या काळामध्ये कलेच्या अविष्काराने मुलांना ताण कमी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला असे उपक्रम नेहमी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देतात असे पालक सवंदना निकम व दिपाली ठोकळे यांनी व्यक्त केले प्रदर्शनात मुलांनी अगदी सुंदर टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू मुद्रा चित्र रंगभरण नारळाच्या करवंटी पासून वाद्ये भेट कार्ड पोस्टर तयार केलेली होती तसेच श्रीमती शिरसाळे यांनी इंग्रजीच्या लेखन कौशल्य व व्याकरण यावर आधारित शैक्षणिक साधने तयार केली होती यामध्ये क्रियापदांचे काटेरी झाड पर्यावरण संवर्धनाकडे लक्षवेधणारे जंगल व इंग्रजीतून प्राणी पक्षी व्यक्ती यांची कल्पनात्मक अभिव्यक्ती सादर केली होती.

नुकत्याच अवकाशातून परतलेल्या आपल्या भारताच्या अभिमान असलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या पूर्ण प्रवासाविषयी या प्रदर्शनामध्ये माहिती दर्शवली होती श्री तांबोळी सर यांनी गणिताची साधने प्रदर्शनामध्ये उपलब्ध करून दिली होती पाचवीच्या मुलांनी 60% पेक्षा जास्त उपक्रम प्रदर्शनामध्ये सादर केले अगदी सुंदर सुंदर पाय पुसण्या ही तयार केल्या होत्या प्रदर्शनासाठी कुमारी तबसून इनामदार कुमारी श्रुतीका काशीद यांनी परिश्रम घेतले. एसएमसी सदस्यांनी याची कौतुक केले केंद्र शाळेतील मुख्याध्यापक श्री केदार सर सहशिक्षक श्री काशीद, गळवे सर यांनी विद्यार्थ्यांना कला कौशल्याच्या उपक्रमावरती प्रात्यक्षिक आणि माहिती मिळण्यास छोटीसी क्षेत्र भेटच मुलांना उपलब्ध करून दिली व मोलाचे सहकार्य केले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here