महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव मध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

0

सांगोला (प्रतिनिधी):-महात्मा फुले विद्यालय, डोंगरगाव येथे १९९२-२०२० पर्यंतच्या ३० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा ३५० माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये दि.१५ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा फुले व कै. माणिकराव बाबर सर (तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन व व झाडांना पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे पदाधिकारी व मुख्याध्यापक तसेच माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केले.

प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.टि. के. काशीद सर यांनी केले. विद्यार्थी मनोगतामध्ये गणेश बाबर, डॉ. प्रकाश मराठे, सुरेखा पवार (मंडल अधिकारी, मुंबई) बेबीताई बाबर (आशा वर्कर), उद्योगपती सुहास गळवे सर, रामकृष्ण शेंडे सर, वैशाली वाघमारे, गणेश खंडागळे, प्रा. सुजाता बाबर, बाळासाहेब राजगे, प्रा. बाबासाहेब गळवे, इंजि. शंकर हिप्परकर, सरपंच तानाजी बाबर सर, अॅड. विशालदिप बाबर, अॅड. सोमनाथ काळे, इंजि. सचिन बाबर, उद्योगपती उमेश चव्हाण, सुनील कदम सर, उद्योगपती चंद्रकांत बाबर इ. माजी विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव सांगितले. गुरु शिष्याच्या अनोख्या नात्याचे भावबंध आपल्या शब्दातून व्यक्त केले. शाळेतून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडावेत व समाजातील गरिबी दूर व्हावी यासाठी सुसंस्कृत नागरिक निर्माण व्हावा अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. काहींनी वर्गात जाऊन चक्क छड्याही खाल्ल्या. खास आकर्षण ठरलेल्या सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढून त्यांनी आपल्या जुन्या आठवणींचे सुंदर चित्र आपल्या सवंगड्यांसह कॅमेराबद्ध केले.

शेवटी कार्यक्रमाची सांगता प्रशालेचे सहशिक्षक श्री. बी. टी. पवार सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here