प्रतिनिधी (शशिकांत कोळी): जलजीवन संदर्भात शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी म्हैशाळ चे अधिकारी व कर्मचारी टीम घेरडी येथील ग्रामपंचायत मध्ये. शेतकरी यांच्या मागणी वरून जलजीवन कृती पंधरवडा 2025 शेतकरी संवाद च्या माध्यमातून घेरडी येथील शेतकऱ्याशी संवाद साधताना जल नियोजन विषयी विविध विषयावर संवाद साधण्यात आला.
याप्रसंगी वंचित पाईपलाईनद्वारे ओढा, नाले, तलाव भरून झाल्यानंतर मागणीनुसार आउटलेट व चेंबर काढण्याची मागणी, ग्रामपंचायत ची 2 बंधारे नाला फंडिंग आहेत पाणी पिण्यासाठी मागणी,मायाक्का मंदिराच्या खालच्या बाजूला असणाऱ्या बंदरात पाण्याची सोय करणे, वंचित मेन लाईन वरून ल.पा.च्या कॅनोलला फंडिंग करणे, वेताळवाडीच्या पूर्वेकडील शेतकऱ्याची मागणी तलाव गट नंबर 189 व गट नंबर 665.(1500 शेतकरी ), काकेकर वस्ती, मागणी अतिरिक्त IV बसविणे, देवकते वाडी , मायनरी 6 वरून लाईन जाणारे आहे 6 व्या किलोमीटर वर सुचवाल काढणे त्याच्या पुढील आबा लवटे च्या घरापाशीचेंबर काढणे तसेच 7 व्या किलोमीटर ला जगन्नाथ खांडेकर च्या घरापाशी चेंबर काढणे, हंगिरगे बिचुकली वस्ती, गरंडे वस्ती गेंड बंधारा line CAD-Choded up आहे. इत्यादी विषयावर शेतकऱ्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी म्हैसाळ अधिकारी नलवडे साहेब उपअभियंता पवार साहेब, गुंडगिरी रावसाहेब जांभळे रावसाहेब तुकाराम भोसले, रावसाहेब नरळे, बयाजी लवटे, हरिभाऊ पुकळे, विठ्ठल मेटकरी मोहसीन पटेल,आबा मोटे,पिंटू पुकळे, सुनील भोरखडे सुभाष मेटकरी,इराप्पा देवकते, मल्हारी देवकते राजू बनसोडे, तानाजी पुकळे,शिवाजी घुटुकडे, कुमार कुंभार, अण्णा माळी, विठ्ठल घुटुकडे सर. आदी उपस्थितित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक