प्रतिनिधी (शशिकांत कोळी): महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा – दामाजीनगर यांच्यावतीने गेल्या ६ वर्षांपासून दरवर्षी त्या वर्षातल्या साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येतात. यावेळी २०२४ वर्षातील प्रकाशित उत्कृष्ठ साहित्यकृतींना पुरस्कार जाहीर झालेले आहेत. यातील वैचारिक साहित्यासाठीचा प्रा. विश्वनाथ ढेपे पुरस्कृत शिवाजी ढेपे स्मृती पुरस्कार ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’ या ग्रंथास जाहीर झाला आहे. वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा चिकीत्सक आढावा घेणारा हा संदर्भग्रंथ आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे कार्याध्यक्ष दिगंबर भगरे यांनी या पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. या पुरस्कारासाठीच्या पुस्तकांची निवड प्रा. डाॅ. दत्ता सरगर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. विश्वनाथ ढेपे आणि रेखा जडे यांच्या निवड समितीने केलेली आहे. सदर पुरस्काराचे वितरण मे महिन्यात मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर यांचे अभिनंदन केले जात आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक