मोकाट जनावरांच्या त्रासाने सांगोलकर हैराण! भररस्त्यावर ठाण मांडून बसल्याने नागरिकांसह, वाहनधारकांना होतोय त्रास

0

सांगोला शहरात मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक व शहरानजीकचे शेतकरीही प्रचंड वैतागलेले आहेत. सांगोला शहरातील भाजी मंडई, वाडेगाव नाका, पंढरपूर रोड,मेन रोड,नगरपरिषदेच्या समोरील रस्त्यावर व नेहरू चौक या ठिकाणी दिवसभरात अनेक वेळा मोकाट जनावरे ठीय्या मांडून बसलेली असतात.तसेच गावात ठिकठिकाणी झुंडीने फिरत असतात. रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.

मोकाट गुरांच्या उपद्रवामुळे सांगोला शहरातील नागरिकांसह, वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत. मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.

सांगोला शहरानजीक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात ही जनावरे पिकांची नासधूस करीत आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तरी लवकरात लवकर शहरातील मोकाट जनावरांचा प्रशासनाने तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक,वाहन चालक, व्यापारी व शेतकरी करीत आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here