लक्ष्मीदेवी सोनंदची सोनाली काशीद आय.टी. विषयात बोर्डात सर्वप्रथम

0

प्रतिनिधी (शशिकांत कोळी): फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत लक्ष्मीदेवी विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील सोनाली सिद्धेश्वर काशीद हिने शास्त्र शाखेत आय.टी. म्हणजेच माहिती तंत्रज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून पुणे बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवीला आहे. लक्ष्मीदेवी शिक्षण संकुलाच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण असून, यापुढेही हे कॉलेज फक्त विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देऊन नवीन विक्रम प्रस्थापित करेल. असा विश्वास संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले यांनी व्यक्त केला.

नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत कॉलेजने 100% निकालाची परंपरा अबाधित ठेवली. आय. टी विषयात मिरामा शेख हिने देखील 100 पैकी 98 गुण,प्रणिशा बाबर हिने 100 पैकी 97 व स्वप्नाली कोडग हिने 93 गुण मिळविले आहेत. 90 पेक्षा जास्त 7 विद्यार्थ्यांनी गुण मिळविले आहेत. तसेच मराठी विषयात अनुराधा बाबर हिने 90 मार्क्स मिळविले आहेत.
शास्त्र शाखा व 10वी करिता वर्षभर साप्ताहिक टेस्ट सिरीज राबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी सतत अभ्यासात राहतो. शालेय परिसरात 100% मोबाईल वापरू दिला जात नाही. प्रत्येक टेस्टचे मार्क पालकांच्या मोबाईल वर पाठविले जातात. अप्रगत विद्यार्थ्यांच्या पालकांना कॉलेजमध्ये बोलावून समज दिली जाते. एकंदरीत विद्यार्थी सतत अभ्यासात कसा राहील हेच पाहिले जाते.

यावर्षी पासून प्रोजेक्टरद्वारे अध्यापन सुरु केले असून, नीट, जे. ई. ई. व साईटी साठी प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन होणार आहे.
संस्था अध्यक्ष मा. बाबासाहेब भोसले, सचिव मा. आनंदराव भोसले यांनी शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सोनंद व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांनी या सोईसुविधांचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here