शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने खा. धैर्यशील मोहिते –पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन
सांगोला ( प्रतिनिधी): माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते –पाटील यांना रेल्वेच्या विविध मागण्यांचे निवेदन शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले.
या निवेदनात गाडी क्रमांक 11027 आणि 11028 दादर– सातारा– दादर रेल्वे आठवड्यातून तीन दिवस सुरू असून प्रवाशांच्या मागणीनुसार ती दररोज सुरू करावी, सकाळ सत्रात कोल्हापूर –कलबुर्गी–कोल्हापूर रेल्वे, सांगली– मिरज –सोलापूर एक्सप्रेस या रेल्वे सेवा सुरू कराव्यात , सांगोल्यातील आर यु बी 32 A च्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात या आग्रही मागण्याचे निवेदन अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आले .यावेळी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, बाबूराव गायकवाड, निलकंठ शिंदे सर,प्रा प्रसाद खडतरे, मकरंद पाटील, महेश नलवडे,अनिल तारळकर यांच्यासह संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
दादर –सातारा –दादर दररोज करिता प्रशासन सकारात्मक
कलबुर्गी– कोल्हापूर– कलबुर्गी, दादर– सातारा– दादर एक्सप्रेस दररोज सुरू करण्याकरता अशोक कामटे संघटनेने रेल्वे मंत्रालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, तसेच खासदार धैर्यशील मोहिते —पाटील यांनीही या प्रश्नाबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले लवकरच रेल्वे बोर्डात याबाबत सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन अशोक कामटे संघटनेस यावेळी त्यांनी दिले
– निलकंठ शिंदे, सर
अध्यक्ष — शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक