कुमारी.प्रणाली अण्णासो घुटुकडे कला शाखेतून 73.00% गुण घेऊन प्रथम
प्रतिनिधी (शशिकांत कोळी): शैक्षणिक वर्ष सन 2024 25 फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घेरडी ता सांगोला जि.सोलापूर या प्रशालेचा एकूण निकाल 75.75% लागला असून जवळा केंद्रात या प्रशालेने आपली उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवत प्रशालेची कुमारी.प्रणाली आण्णासो घुटुकडे ही विद्यार्थिनी जवळा केंद्रात 73.00% टक्के गुण घेऊन कला शाखेतून प्रथम आली.
तसेच कुमारी .पल्लवी आनंदा भोसले हिने 72.16%गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कुमारी कोमल चंद्रकांत हातेकर या विद्यार्थिनीने 69.00%टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावले आहे. प्रशालेत कुमार कृष्णा विवेकानंद लांडगे *66.00%गुण घेऊन चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तसेच पाचवा क्रमांक-कुमारी वर्षा लक्ष्मण सरगर 64.33%या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.विठ्ठल बी घुटुकडे , मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.दिलीप मोटे, तसेच प्राध्यापक. श्री. व्ही.एम खंदारे प्रा . श्री.एम.बी.खरात प्रा. श्री.के ए करे त्याचबरोबर प्रशालेतील सर्व इतर स्तरावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक