भेटवस्तू / पुष्पहार न देता शैक्षणिक साहित्य भेट देण्याची विनंती!
सांगोला ( प्रतिनिधी )- सामाजिक कार्यात सांगोला तालुक्यात अग्रेसर असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या (रजि.) संस्थेच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ श्री. राजू बंडगर व सौ.सुरेखा बंडगर या दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते रविवार दि. १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र यादव व सचिव संतोष महिमकर यांनी दिली.
गेल्या सहा वर्षापासून सामाजिक कार्यात नावलौकिक कमावलेल्या आपुलकी प्रतिष्ठान सांगोला या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ नगरपालिकेशेजारी माळवाडी रस्त्यावर असलेल्या नगरपालिकेच्या गाळा क्र. ३ मध्ये होत असून आपुलकीच्या देणगीदारांनी, आपुलकीवर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकानी रविवार १८ मे रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून आपुलकी दाखवावी, अशी विनंती आपुलकी सदस्यांकडून करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास भेटवस्तू / पुष्पहार वगैरे न आणता वह्या / पेन व इतर शैक्षणिक साहित्य आणले तर ते आनंदाने स्वीकारले जाईल असेही संयोजकांनी कळवले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक