तरंगेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी माजी आमदार दीपकआबा गट व घुटुकडे गटामध्ये युतीची चर्चा!

0

शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्लाला सुरुंग लागणार?

 

सांगोला (प्रतिनिधी):  न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे यामुळे सांगोला तालुक्यातील सर्वच गट सक्रिय झालेले आहेत. यातच लोकसभा ,विधानसभा निवाडणूक लढवलेले सांगोला तालुक्यातील घुटुकडे गट हा तरंगेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मा आमदार दीपकआबा गट व घुटुकडे गटामध्ये युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे सत्ता परिवर्तन होणार हे निश्चित झाले आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

तरंगेवाडी ग्रामपंचायतचे अनेक प्रश्न हे सोडवण्यात विद्यमान सत्ताधारी पक्षाचे सदस्य व सरपंच हे अपयशी ठरलेले आहेत, असे लोकांच्या मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत मध्ये माजी आमदार दीपकआबा गट व घुटुकडे गट यांच्या युतीची चर्चा जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुका झाल्यापासून सांगोला तालुक्यात सत्ताधारी आमदारांकडून एकही भरीव विकासाचे काम झाले नाही त्यामुळे जनसमुहांमध्ये नाराजीचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे.आता पासुनचं युती आघाडीची चर्चा सांगोल्यात जोर धरु लागली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here